तिळाच्या बिया: पौष्टिक मूल्य, फायदे, उपयोग, तोटे | Sesame Seeds In Marathi

मित्रांनो, आपण या लेखांमध्ये तिळच्या बिया (Sesame Seeds In Marathi) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तिळला इंग्रजी भाषेत Sesame Seeds ओळखले जाते. तसेच यामध्ये छोट्या प्रमाणात पौष्टिक तत्त्व देखील भरलेले आहेत.

हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत, आणि प्रत्येक रेसिपी मध्ये तिळाचा वापर होत असतो आणि खूप प्राचीन काळापासून वापर होत आलेला आहेत.

जसे की तिळाचा लाडू, तिळगुळ, चिक्की अशा अनेक पदार्थांमध्ये त्याचा वापर होत असतो. तसंच तिळाच्या रेसिपीला एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहेत, कारण त्यामध्ये खूप सारे कॅल्शियमचे, खनिजे, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडेंट हे भरपूर प्रमाणात आढळून येतात.

हे सर्व पोषक तत्व हृदयरोग, डायबिटीस, रक्तदाब आणि पचन समस्या सारख्या आजारांपासून ते संरक्षण देत असतात. तसेच तिळाचा वापर हा केवळ अन्नामध्येच नाही तर आयुर्वेदामध्ये देखील केला जातो.

केस गळतीसाठी तर हे खूप फायदेशीर आहेत, त्वचे जर कोरडी पडत असेल तर उत्तम पर्याय आहेत, तुम्ही तिळाचा तेलाचा वापर करू शकतात.

Sesame Seeds In Marathi
Sesame Seeds In Marathi

तिळाचा इतिहास | History of Sesame Seeds

तिळ हे जगातील सर्वात जुन्या पिकांपैकी एक पीक आहे, याचा वापर हजारो वर्षापासून अन्न, औषध आणि धार्मिक विद्यांमध्ये केला जात असतो.

प्रथम तिळाचा चा उगम हा सर्वप्रथम आफ्रिका खंडामध्ये झाला. कारण तिथे उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत. त्यानंतर भारत, चीन, मध्यपूर्व आणि इतर देशांमध्ये नंतर तिळाचा लागवड आढळून येताच.

तसेच तिळाचा वापर मजबूत करण्यासाठी आणि तिळाचा तेलाचा वापर, तुम्ही खाद्यतेला साठी देखील करू शकतात. तसेच भारतात त्याला खूप धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे.

कारण मकर संक्रांत या सणाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात तिळगुळ हे असतं, आणि ते एकमेकांना देऊन म्हणतात या सणाच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे लाडू, चिक्की आणि गोडधोड पदार्थ करतात आणि हे सर्व लोकप्रिय पदार्थ आहेत.

तिळ म्हणजे काय | What is Sesame Seeds?

What is Sesame Seeds

तिळाचा आकार हा खूप लहान असतो साधारणपणे २ ते ४ मिलिमीटर लांब असतो. तिळाला इंग्लिश मध्ये Sesame seeds म्हणून ओळखले जाते हे या वनस्पती पासून तयार होतात.

तसेच त्यापासून आपल्याला कॅल्शियम प्रोटीन लोह ओमेगा अँटिऑक्सिडंट. हे असे महत्त्वपूर्ण पौष्टिक तत्व त्यापासून आपल्याला मिळतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी एकदम उपयुक्त आहेत.

तसेच तिळाचा वापर करून आपण अन्नपदार्थांमध्ये लाडू चिक्की बनू शकतात, आणि तिळाचा तेल आपण स्वयंपाकासाठी आणि औषधी मालिश साठी देखील उपयोग करू शकतात.

त्याचा आयुर्वेदिक उपचार म्हणजे सर्दी खोकला साठी आपण करू शकतो, वा अजून एक महत्त्वाचं म्हणजे तिळाचा वापर आपण सौंदर्यप्रसाधने म्हणजे त्वचा ग्लो करण्यासाठी आणि केसांच्या वाढण्यासाठी आपण वापर करू शकतो.

तिळाचे पौष्टिक मूल्य | Nutritional Value of Sesame Seeds in Marathi

पोषक तत्वप्रमाण (100 ग्रॅममध्ये)
कॅलरीज573 kcal
प्रोटीन17.7 ग्रॅम
चरबी49.7 ग्रॅम
कार्बोहायड्रेट23.4 ग्रॅम
फायबर11.8 ग्रॅम
कॅल्शियम975 mg (97% DV*)
लोह14.6 mg (81% DV*)
मॅग्नेशियम351 mg (84% DV*)

तिळाचे आरोग्य फायदे | Health Benefits of Sesame Seeds in Marathi

Health Benefits of Sesame Seeds in Marathi

#हृदयरोगांपासून संरक्षण मिळते (Good for Heart Health)

तिळात ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि सेसमिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदय आरोग्य राखण्यास मदत करतात.

#हाडांच्या मजबूती साठी (Bone Strength)

तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जिंक असते, जे हाडांची घनता वाढवते. ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांपासून बचाव होतो.

#रक्तदाब नियंत्रित होतो (Controls Blood Pressure)

तिळातील मॅग्नेशियम रक्तवाहिन्या आराम देते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करते.

#पचनक्रिया सुधारते (Improves Digestion)

तिळातील फायबर पचनसंस्थेसाठी उत्तम आहे. कोष्ठबद्धता (Constipation) कमी करते.

#त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर (Good for Skin & Hair)

तिळामधील झिंक आणि विटामिन E त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांची वाढ होण्या मदत होते.

तिळाचे प्रकार | Types of Sesame Seeds in Marathi

तिळ प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात:

  1. पांढरे तिळ (White Sesame Seeds) – सर्वात सामान्य, लाडू, गुळ आणि तेल बनवण्यासाठी वापरले जातात.
  2. काळे तिळ (Black Sesame Seeds) – अधिक पौष्टिक, आयुर्वेदात औषधी म्हणून वापरले जातात.
  3. तपकिरी तिळ (Brown Sesame Seeds) – यामध्ये पांढऱ्या आणि काळ्या तिळाचे मिश्रण असते.

तिळाचे तोटे | Disadvantages of Sesame Seeds in Marathi

# वजन वाढते

  • तिळामध्ये कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण जास्त असते (100 ग्रॅममध्ये ~573 कॅलरी). जर तुम्हाला वजन कमी कराचा असाल, तर तिळाचा अति सेवन टाळावा.

# किडनी स्टोन होण्याची शक्यता

  • तिळामध्ये ऑक्झलेट्स नावाचे पदार्थ असतात, जे किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरू शकतात. ज्यांना आधीच किडनी स्टोन माहिती असेल तर त्यांनी तिळ कमी खावे.

# एलर्जी चा धोका निर्माण होऊ शकतो

  • काही लोकांना तिळाची एलर्जी असते, ज्यामुळे खाज, सूज, सारखी तक्रारी होऊ शकते. जर तुम्हाला बदाम, काजू यांची एलर्जी असेल, तर तिळापासूनही त्रास होऊ शकतो.

निष्कर्ष | Conclusion

आपण वरील संपूर्ण लेखांमध्ये तिळच्या बिया (Sesame Seeds In Marathi) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसं त्याचं पण एक संस्कृतिक महत्त्व आहे ते पण आपण जाणून घेतलं कारण भारतीय संस्कृतीमध्ये तिळाला खूप महत्त्व आहेत.

कारण मकर संक्रांति या सणाच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये तिळाचे लाडू, तिळगुळ, चिक्की बनवून एकमेकांना आपण वाटतो आणि म्हणतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

तसंच तेव्हापासून आपल्याला पौष्टिक घटक मिळतात ते म्हणजे कॅल्शियम, प्रोटीन, लोह, एंटीऑक्सीडेंट हे सर्व आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात यापासून आपल्याला आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत मिळते.

आपल्याला तीन प्रकारे बघायला मिळतात पांढरे, काळे, तपकिरी अशा तीन रंगांमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात, त्यांचे वैशिष्ट्य आणि पौष्टिक गुणधर्म देखील वेगवेगळे असतात.

हे पण वाचा: हळीवच्या बिया: इतिहास, फायदे, तोटे, उपयोग

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *