पिस्ता: प्रकार, फायदे, उपयोग | Pistachio In Marathi
मित्रांनो, आपण या लेखामध्ये पिस्ता या ड्रायफ्रूट फळाबद्दल (Pistachio In Marathi) माहिती पाहू या. पिस्ता हा ड्रायफ्रूट हिरव्या रंगाचा असतो आणि त्याची चव एकदम चांगली असल्यामुळे तो आपल्याला आरोग्यासाठी एकदम फायदेशीर आहेत.
पिस्ता हा केव्हा आपल्याला नश्त्यातचा पदार्थ नाही आहेत. तर तो आपल्याला आरोग्यासाठी एक सुपरफूड पैकी एक आहेत, त्याची चव आणि त्याचा संपूर्ण सुगंध हा जवळजवळ प्रत्येकाला आवडतो.
पिस्ता हे ड्रायफ्रूट फाळ जास्त करून मध्य आशिया आणि मध्य पूर्व भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्याचा बाहेरचा भाग हा खूप कडक असतो आणि आतील भाग हिरव्या रंगाचा असतो. पिस्ता या फळची चव थोडी गोड आणि थोडी तिखट सारखा लागत.
तसेच पिस्ता या फळ पासून आपल्याला वेगवेगळे फायदे मिळतात आरोग्यासाठी जसे की प्रथिने, चरबी, फायबर, विटामिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात आहेत. तसेच आपण या लेखामध्ये बघणार आहोत पिस्ता या फळाचे फायदे, उपयोग आणि संपूर्ण इतिहास व पोषक मूल्य कोणकोणते आहेत.

पिस्ता म्हणजे काय? | What is Pistachio?
पिस्ता हा एक अत्यंत चवदार आणि आरोग्यदायी ड्राय फ्रूट पैकी एक आहे, तसेच हा ड्रायफ्रुट पदार्थ सर्वनाच लोकप्रिय आहेत. तसेच पिस्ता या फाळाच रंग हा हिरवा असतो आणि त्याच्या विशिष्ठ चव मुळे खाण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहेत.
पिस्ता हे फळ मध्य आशिया आणि मध्य पूर्व या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत, पिस्त्याचे अनेक पोषक फायदे आहेत, जसे की प्रथिने, चरबी, फायबर, विटामिन्स आणि खनिजे. हे सर्व पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
पिस्ता हृदयरोग, डायबिटीज, आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी उत्तम आहे. पिस्ता या फळापासून तुम्हाला वजन कमी करण्यास मदत देखील होते.
पिस्त्याचा वापर केवळ खाण्यासाठीच नाही तर सौंदर्यप्रसाधनातही केला जातो. पिस्त्याचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे, ते त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते.
तसेच, पिस्त्याचा वापर मिठाई, केक, आईस्क्रीम आणि इतर पदार्थांमध्ये केला जातो, ज्यामुळे त्यांची चव आणि सुगंध वेगळी झलक देतात.
पिस्ता खाण्याचे योग्य प्रमाण दररोज सुमारे 20-30 ग्रॅम असावे. जास्त प्रमाणात खाण्याने कॅलरीज वाढू शकते. पिस्ता हा एक महाग ड्राय फ्रूट आहे.
पिस्त्याचा इतिहास आणि तो कोठे आढळतो? | History and Origin of Pistachio

पिस्ता हा एक अतिशय पुरातन ड्राय फ्रूट पैकी आहे, ज्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीपासून सुरू आहेत. पिस्ता हे फळ मध्य आशिया आणि मध्य पूर्व भागात आढळून येतात, प्राचीन काळापासून पिस्ता हा मानवी आहाराचा भाग राहिला आहे.
पिस्ता हे फळ संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत, मध्य आशियातून , ग्रीस, रोम, आणि तसेच इतर युरोपियन देश्यांमध्ये आढळून येतात.
१९ व्या शतकापासून अमेरिके मधे पिस्ता या ड्रायफ्रूट फळाची लागवड सुरू करण्यात आली. तसेच अमेरिका या देश्याला सर्वात मोठा पिस्ता उत्पादक देश म्हणून ओळखला जातो.
पिस्ता कोठे आढळतो?
पिस्ता हा मुख्यतः उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढतो.
- इराण – इराण हा देश जगातील सर्वात मोठा पिस्ता उत्पादक देश आहे.
- अमेरिका – कॅलिफोर्निया येथे मोठ्या प्रमाणात पिस्त्याची लागवड केली जाते.
- तुर्कस्तान – तुर्कस्तानमध्ये पिस्त्याची शेती प्राचीन काळापासून केली जाते.
- चीन – चीनमध्येही पिस्त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
- भारत – भारतात पिस्त्याची लागवड मर्यादित प्रमाणात केली जाते, पण वाढत आहेत.
पिस्त्याची लागवड:

पिस्ता या झाडाचे वर्णन हे झाड सुमारे १० ते १२ मीटर उंचीपर्यंत वाढू शकतो, तसेच त्याझाडाला पिक येण्यासाठी सुमारे ७ ते १० वर्ष लागतात. पिस्त्याची शेती करण्यासाठी योग्य हवामान आवश्यक असते जसे की उष्ण आणि कोरडे.
पिस्त्याचे झाडा खूप वर्षानुवर्ष टिकू शकते २०० वर्ष हे झाड टिकू शकते, ज्यामुळे हे झाड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
पिस्त्याचा इतिहास आणि त्याचा प्रसार हा त्याच्या महत्त्वाचे प्रतीक आहे. आजही पिस्ता हा जगभरातील लोकप्रिय ड्राय फ्रूट म्हणून ओळखला जातो.
पिस्त्याचे पोषक मूल्य | Nutritional Value of Pistachio
पिस्ता हा एक सुपरफूड म्हणून ओळखला जातो. यामध्ये प्रथिने, चरबी, फायबर, विटामिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात आहेत. खालील टेबलमध्ये पिस्त्याचे पोषक मूल्य दिले आहे:
पोषक तत्व | प्रमाण (100 ग्रॅममध्ये) |
---|---|
कॅलरीज | 562 kcal |
प्रथिने | 20 ग्रॅम |
चरबी | 45 ग्रॅम |
कार्बोहायड्रेट्स | 28 ग्रॅम |
फायबर | 10 ग्रॅम |
विटामिन B6 | 1.7 मिलीग्रॅम |
पोटॅशियम | 1025 मिलीग्रॅम |
पिस्त्याचे फायदे | Benefits of Pistachio in Marathi
पिस्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत.
1. हृदयासाठी फायदेशीर
पिस्ता हा हृदयासाठी फायदेशीर आहेत , त्यात असलेले मोनोअनसॅच्युरेटेड चरबी आणि पोटॅशियम हे हृदयासाठी उत्तम आहेत.
2. वजन कमी करण्यास मदत
पिस्त्यातील फायबर आणि प्रथिने पोट भारल्यासारखे वाटते ज्यामुळे तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा होत नाही. हे वजन कमी करण्यास मदत करते.
3. डायबिटीज कंट्रोल करणे
पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे तो डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम आहे.
4. डोळ्यांच्या आरोग्यासाठी
पिस्त्यात ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत.
5. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
पिस्त्यातील विटामिन B6 आणि इतर पोषक तत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
पिस्त्याचे उपयोग | Uses of Pistachio in Marathi

पिस्ता हा केवळ खाण्यासाठीच नाही तर त्याचे अनेक उपयोग आहेत.
1. स्वयंपाकात
पिस्त्याचा वापर मिठाई, केक, आईस्क्रीम आणि इतर पदार्थांमध्ये केला जातो. त्याची चव आणि सुगंध पदार्थांना एक वेगळी झलक देते.
2. सौंदर्यप्रसाधनात
पिस्त्याचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. ते त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते.
3. आरोग्यासाठी
पिस्त्याचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तुम्ही त्याचे सेवन स्नॅक्स म्हणून किंवा इतर पदार्थांसोबत देखील करू शकतात.
पिस्ता खाण्याचे योग्य प्रमाण | How Much Pistachio to Eat Daily?
पिस्ता खाणे फायदेशीर आहे, पण त्याचे प्रमाण योग्य असावे. दररोज सुमारे 20-30 ग्रॅम पिस्ता खाणे पुरेसे आहे. जास्त प्रमाणात खाण्याने कॅलरीज वाढू शकते.
पिस्ता कोणत्या प्रकारचा असतो? | Types of Pistachio
पिस्ता विविध प्रकारचा असतो. काही मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
- कच्चा पिस्ता – हा नैसर्गिक स्वरूपात असतो आणि त्यात कोणतेही अतिरिक्त मसाले किंवा मीठ नसते.
- भाजलेला पिस्ता – याला भाजून मीठ किंवा इतर मसाले सोबत खाऊ शकतात.
- सोललेला पिस्ता – याचे कवर काढून टाकलेले असते.
पिस्ता कोठे वाढतो? | Where Does Pistachio Grow?
पिस्ता हा मुख्यतः मध्य आशिया आणि मध्य पूर्व भागात आढळतो, इराण, अमेरिका, तुर्कस्तान, आणि चीन हे पिस्ता हा जास्त प्रमाणात या देशामध्ये आढळतो. भारतातही पिस्त्याची लागवड केली जाते, पण ती मर्यादित प्रमाणात होते.
पिस्त्याची किंमत | Price of Pistachio in India
पिस्ता हा इतर ड्राय फ्रूट्सपेक्षा महाग असतो. भारतात पिस्त्याची किंमत सुमारे 1000 ते 1500 रुपये प्रति किलो असते. त्याची किंमत प्रकार आणि गुणवत्तेनुसार बदलत असते.
पिस्ता साठवण्याचे योग्य मार्ग | How to Store Pistachio in Marathi
पिस्ता हा एक नाजूक ड्राय फ्रूट आहे, त्यामुळे त्याची योग्य साठवणूक करणे हे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने साठवल्यास पिस्त्याची चव आणि पोषक मूल्य कमी होऊ शकते. येथे काही सोप्या टिप्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही पिस्ता जास्त काळ टिकवू शकता:
#थंड आणि कोरड्या जागी ठेवा
पिस्ता थंड आणि कोरड्या जागी ठेवला पाहिजे. उष्णता आणि ओलावा यामुळे पिस्ता खराब होऊ शकतो.
#एअरटाइट डब्या मध्ये ठेवा
पिस्ता एअरटाइट डब्या मध्ये ठेवा जेणेकरून तो हवेच्या संपर्कात येणार नाही.
#फ्रिजमध्ये ठेवा
जर तुम्हाला पिस्ता खूप दिवस टिकवायचा असेल, तर तो फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये तो 6 महिन्यांपर्यंत टिकू शकतो.
पिस्ता फ्रीझरमध्ये ठेवल्यास तो 1 वर्षापर्यंत टिकू शकतो.
पिस्त्याशी संबंधित 4 सामान्य प्रश्न (FAQs)
Q1. पिस्ता खाण्याने वजन वाढते का?
नाही, योग्य प्रमाणात पिस्ता खाण्याने वजन वाढत नाही. उलट, ते वजन कमी करण्यास मदत करते.
Q2. पिस्ता कोणत्या आजारांसाठी चांगला आहे?
पिस्ता हृदयरोग, डायबिटीज, आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी चांगला आहे.
Q3. पिस्ता खाण्याची योग्य वेळ कोणती ?
पिस्ता सकाळी नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणानंतर स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात.
Q4. पिस्त्याचे तेल वापरायचे का?
होय, पिस्त्याचे तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
निष्कर्ष | Conclusion
मित्रांनो, आपण वरील संपूर्ण लेखामध्ये पिस्ता या ड्रायफ्रूट फळा विषयी संपूर्ण माहिती बघतली. पिस्ता हे फळ एक अतिशय चवदार आणि आरोग्यदायी ड्रायफ्रुट पैकी एक आहेत, पिस्ता या फाळाचा इतिहास हा खूप वर्षापूर्वीपासून सुरू आहेत आणि आता आजही संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेला आहेत.
पिस्ता या फळा मध्ये कोणते कोणते पौष्टिक तत्व आपल्याला आरोग्याला फायदेशीर आहेत या. मध्ये मुख्यत: प्रथिने, चरबी, फायबर, विटामिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात आहेत, जे आपल्या हृदय, डोळे, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फायदेशीर आहेत.
पिस्त्याचे सेवन सुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकतात आणि त्याचा वापर तुम्ही स्नॅक्स मध्ये ही करू शकतात तसेच, स्वयंपाकात किंवा सौंदर्यप्रसाधनात करू शकता.
त्याची योग्य साठवणूक करून तुम्ही पिस्त्याची चव आणि पोषक मूल्य टिकवू शकता. पण या साठी त्याची योग्य साठवणूक झाली पाहिजे.
जर तुम्ही पिस्ता जे फळा तुम्ही तुमच्या आहरात समाविष्ट करत नसेल तर आज पासून नक्की करा कारण हे आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
हे पण वाचा: कलोंजी: इतिहास, प्रकार, फायदे, तोटे