काळी मोहरी: इतिहास, पोषक तत्व, फायदे, तोटे | Black Mustard Seeds In Marathi
मित्रांनो, आपण या संपूर्ण लेखांमध्ये काळे मोहरी (Black Mustard Seeds In Marathi) याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच काळे मोहरी चे कोण कोणते फायदे आहेत, आणि त्यांचा वापर कसा करू शकतात, त्याचा औषधी गुणधर्म काय आहेत, संपूर्ण इतिहास आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
काळ्या मोहरीला इंग्रजी भाषेमध्ये ” ब्लॅक सीड्स ” असं म्हटले जाते. तसेच काळा सीड्स आपल्या आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पचनक्रिया शक्ती देखील सुधरवते, डायबेटिस असेल तर डायबेटिस देखील नियंत्रण मध्ये येतो, त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
काळे मोहरी हे जास्त करून इजिप्त, ग्रीक आणि भारताच्या काही भागात आढळून येतात. कारण त्यांना योग्य हवामानाची गरज असते त्यामुळे ते जास्त प्रमाणात आढळते.

काळी मोहरीचा इतिहास | Black Mustard Seeds History
काळ्या मोहरी चा हजारो वर्षापासून इतिहास सुरू आहे, हे एक आयुर्वेदिक औषध आहे याचा वापर आयुर्वेदामध्ये हरबल मेडिसिन बनवण्यासाठी केला जात असतो.
अनेक आजारांवर काळ्या मोहरी हे गुणकारी आहेत, जसे की हृदयरोग , डायबिटीस, त्वचेचा विकार, पचन क्रिया समस्या ,रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अशा अनेक खूप साऱ्या समस्यांवर काळ्या मोहरी या मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतात.
प्राचीन इजिप्त मध्ये काळ्या मोहरीचा वापर करून अन्न , औषध आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापर केला जातो. तसेच मुख्यता म्हणजे पचन आणि त्वचा समस्यांवर उपचार करण्यासाठी एक आयुर्वेदिक महत्त्व साठी वापर केला जातो.
काळी मोहरी म्हणजे काय? | What is Black Mustard Seeds?

काळी मोहरी ही एक वनस्पती आहेत जी Nigella Sativa या वनस्पतीच्या बिया पासून ती तयार झालेली आहेत. या बियांचा रंग काळा असून त्यांची खाण्याची चव ही कडू आणि तिखट असते.
तसेच भारतीय पदार्थांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी मध्ये मसाला म्हणून वापर केला जातो, तसेच तेलामध्ये देखील वापर केला जातो, आणि औषधी उपचारांमध्ये देखील वापर केला जात असतो.
तसेच काळ्या मोहरी तुम्ही कशा प्रकारे वापरू शकतात तुम्ही कच्च्या स्वरूपात देखील वापरू शकतात, तेलाच्या माध्यमातून देखील वापरू शकतात, आणि तुम्हाला जर मसाल्यामध्ये जर वापरायचं असेल तर ते देखील वापरू शकतात.
या काळ्या मोहरी चे देखील काही दुष्परिणाम आहेत, ते म्हणजे तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते जर तुम्ही जास्त प्रमाणात मोहरी खालली तर,
आणि सर्वप्रथम जर तुम्ही गर्भवती स्त्रिया असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही काळ्या मोहरीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करावा.
काळ्या मोहरीचे इतर नावे | Other Names of Black Mustard Seeds
मराठी | हिंदी | इंग्रजी |
---|---|---|
काळे मोहरी | कलोंजी | Black Seeds |
कृष्णजीरा | मंगरैला | Nigella Seeds |
काळ्या मोहरीचे पोषक तत्व | Nutritional Value of Black Mustard Seeds

काळ्या मोहरीमध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात, जसे की:
- थायमोक्विनोन (Thymoquinone) – शक्तिशाली ऍंटी-इन्फ्लेमेटरी आणि ऍंटीऑक्सिडंट गुणधर्म.
- प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम – शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे लागतात.
- ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड्स – हृदयासाठी फायदेशीर आहेत .
काळ्या मोहरीचे आरोग्य साठी काही फायदे | Health Benefits of Black Mustard Seeds
# रोगप्रतिकारक शक्ती वाढवते (Boosts Immunity)
काळ्या मोहरीमध्ये ऍंटीबॅक्टेरियल आणि ऍंटीव्हायरल असे गुणधर्म असतात , जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. रोज एक चमचा काळे मोहरी पावडर मधून घेतल्यास सर्दी-खोकला,पासून बचाव होतो.
# पचनशक्ती सुधारते (Improves Digestion)
जर तुम्हाला पोटदुखी, गॅस, अपचन सारखा वाटत असेल, तर काळ्या मोहरीचा वापर करा कारण हे अन्नाचे पचन सुधारते.
# डायबिटीज नियंत्रण (Controls Diabetes)
रिसर्चनुसार, काळ्या मोहरीमधील थायमोक्विनोन रक्तातील शर्करा पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
# त्वचेसाठी फायदेशीर (Benefits for Skin)
- मुरुम, खाज, एक्झिमा कमी होण्यास मदत करते. तेलाचा वापर केल्यास त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
# वजन कमी करण्यास मदत (Weight Loss)
काळ्या मोहरीतील फायबर आणि ऍंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म चयापचय वाढवतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
काळ्या मोहरीचा वापर कसा प्रकारे करावा? | How to Use Black Mustard Seeds?

# कच्च्या स्वरूपात (Raw Consumption)
- रोज सकाळी 1 चमचा काळे मोहरी कोमट पाण्याबरोबर घ्या. तसेच जर तुम्ही मधासोबत खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
# तेल म्हणून (Black Seed Oil)
- त्वचेवर लावा किंवा जेवण सोबत खाऊ शकतात व केशांसाठी हे तेल अत्यंत फायदेशीर आहे.
# मसाल्यात (As a Spice)
- पाव, पराठे, सालडा या सर्वान सोबत तुम्ही खाऊ शकतात व पक्वान्नांमध्ये स्वाद आणि आरोग्य दोन्ही मिळेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. काळी मोहरी आणि काळी तीळ यात काय फरक आहे?
काळी मोहरी (Nigella Sativa) ही वेगळी आहे, तर काळी तीळ (Sesame Seeds) ही जास्त तेलाची बिया आहे.
Q2. काळ्या मोहरीचे तेल केसांसाठी चालेल?
होय! केसांची वाढ आणि केस गळती कमी करण्यासाठी उपयुक्त.
Q3. रोज किती काळी मोहरी खावी?
दिवसातून 1 ते 2 चमचे पुरेसे आहेत.
Q4. काळी मोहरी उबट का लागते?
त्यात थायमोक्विनोन असल्यामुळे त्याची चव थोडी कडू आणि तिखट लागते.
निष्कर्ष | Conclusion
मित्रांनो वरील संपूर्ण लेखांमध्ये आपण काळी मोहरी (Black Mustard Seeds In Marathi) या बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली, काळी मोहरी ही एक सुपर फूड म्हणून ओळखली जाते.
आणि याला कलोंजी चा सारखं सीड्स देखील म्हटलं जातं, कारण ही आयुर्वेदामध्ये आणि युनानी मेडिसिन मध्ये हजारो वर्षापासून वापर होत आहे.
आणि हे एक गुणकारी पदार्थांमधलं एक पदार्थ आहे जे सर्वांच्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे आणि याचे देखील खूप सारे वेगवेगळे फायदे आढळून येतात.
काळी मोहरी ही एक वनस्पती बी आहे जे ब्लॅक सीड्स, Nigella Seeds या दोघांच्या माध्यमातून एक बिया च रूपांतर होतं. यामधून आपल्याला प्रोटीन फायबर आर्यन कॅल्शियम जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक पोषक तत्व आहेत अशे तत्व आपल्याला काळ्या मोहरीच्या स्वरूपातून मिळतं.
हे पण वाचा: बेसिल सीड्स: पोषक मूल्य, फायदे, तोटे